मुंबई- बाॅलीवूड अभिनेता अक्षयकुमार हा चा सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे.वर्षभरात तो चार ते पाच चित्रपट करत असतो. एकाचे प्रमोशन संपत नाही तर दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणात अक्षय कामात गुंतून जातो. कामासोबत तो कुटुंबाबरोबर सुट्टीसाठी वेळही काढत असतो.अक्षय कुमारच्या वेळेचे नियोजन प्रत्येकाला चक्रावून टाकते. विशेष म्हणजे तो बाॅलीवूडमध्ये सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता आहे. या संबंधीच आता आयकर विभागाने त्याचा सन्मान केला आहे.
अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये आपला आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.अक्षयला एक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तो हिंदी चित्रपट उद्योगात सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे. त्याच्या वतीने त्याच्या टीमने हे सन्मानपत्र स्वीकारले आहे. गेल्या पाच वर्षांत त्याचा सतत भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश होतो.अक्षय सध्या इंग्लंडमध्ये जसवंतसिंह गिल यांच्या बायोपिकच्या चित्रीकरण करत आहे. तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतू शकतो. त्यानंतर तो आपला आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’च्या प्रमोशन करणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात त्याची सहकलाकार म्हणून भूमी पेडणेकर आहे. या व्यतिरिक्त अक्षयचा सेल्फी, राम सेतू, ओ माय गाॅड २ आणि बडे मियाँ छोटे मियाँ हे चित्रपट येणार आहेत