संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

अखेर नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी ? सिडको सज्ज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी मुंबई- नवी मुंबई मेट्रोची इत्थंभूत माहिती असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मेट्रोची सद्यःस्थिती जाणून घेतली असून, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुढील महिन्यात नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाचा आरंभ करण्याची शक्यता आहे. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त ठरविला जाण्याची शक्यता आहे. सिडकोने सर्व सोपस्कार व तयारी पूर्ण केल्याने आरंभाचा नारळ वाढविण्याची तयारी केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दाखविल्यास ही सेवा सुरू केली जाणार आहे.
नवी मुंबईच्या दक्षिण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने चार मेट्रो मार्गांची आखणी केली आहे.त्यातील बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे हे काम पहिल्या चार वर्षांत पूर्ण होण्याऐवजी आता दहा वर्षांनी अर्धे पूर्ण होत आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी संथगतीने चाललेल्या या मेट्रो कामाला गती देण्यास प्राधान्य दिले. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनऐवजी महामेट्रोला या प्रकल्पावर देखरेख व अभियंता साहाय्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या या प्रकल्पातील खारघर ते पेंधर या पाच किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील अर्धा टप्पा पूर्ण करण्यास यश आले आहे. या मार्गावरील ऑसिलेशन, विद्युत, सुरक्षा, अत्यावश्यक ब्रेक, प्रमाणपत्रासह रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षाविषयक चाचणी प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. या मार्गावर चालणार्‍या डब्यांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. केवळ हिरवा झेंडा दाखवण्याचा अवकाश असून, नवी मुंबईतील पहिली मेट्रो धावणार आहे.
नगरविकास मंत्री असताना चार महिन्यांपूर्वी शिंदे यांनी खारघर ते पेंधर या मेट्रो मार्गाचा प्रवास केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काही दिवसांतच या मार्गाचा शुभारंभ होण्याची शक्यता सिडको वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.त्यासाठी येत्या १५ ऑगस्टची चाचपणी केली जात असून, यासाठी केंद्र व राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांची उपस्थिती आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami