संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

अग्निपथ योजनेत जात आणि धर्म विचारल्याने विरोधक आक्रमक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
संजय सिंह यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सैन्य भरतीमध्ये जात विचारली जात आहे. मोदीजी नक्की अग्निवीर तयार करत आहेत, की जातीवीर, असा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र अग्निपथ योजनेबाबत सिंह यांनी केलेल्या ट्विटनंतर गदारोळ झाला.

संजय सिंह यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, उमेदवारांकडे जात आणि धर्माचं प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कर भरतीमध्ये जात विचारली जात असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय,मोदीजी दलित/मागास आणि आदिवासींना सैन्य भरतीसाठी पात्र मानत नाहीत का? अस प्रश्न उपस्थित करत, ते म्हणाले, भारताच्या इतिहासात पाजिल्यांदाच लष्कर भरतीमध्ये जात विचारली जात आहे. मोदीजी, तुम्ही देशाला नक्की अग्नीवर देत आहात की जातीवीर, असा टोला त्यांनी हाणला. यानंतर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही याप्रकरणी ट्विट करत साधूची जात विचारू नका पण सैनिकाची जात विचारा, असे म्हटले आहे. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेसाठी जुन्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर जे पूर्वीपासून आहे तेच रकाने यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात लष्कराकडून सांगण्यात आले आहे की, उमेदवारांनी जात-धर्माचे रकाने भरावे लागतात.अग्निवीरांच्या भरतीसाठी नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, या आरोप प्रत्यारोपांनंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताचे सैन्य धर्म किंवा जातीच्या आधारावर भरती केले जात नाहीत. २०१३ मध्ये भारतीय लष्कराने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते की सैन्य भरती प्रक्रियेत जातिला महत्व नाही. मात्र तरीदेखील सैन्य भरतीसाठी जातीचा एक स्तंभ भरणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टी आणि काही पक्षांच्या नेत्यांकडून तरुणांमध्ये अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami