संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

अचानक मालगाडीचे कपलिंग तुटले! वाहतूक विस्कळीत, प्रवाशी संतप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबिवली ते टिटवाळा दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पहायला मिळाली.तर दुसरीकडे काल रात्री आसनगाव ते वासींद दरम्यान एक तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र हा मेगाब्लॉक अचानक घेण्यात आल्याने त्याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर झाला होता.आज पहाटे अनेक गाड्या रद्द केल्याने कासारा ते कल्याण असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

या घटनेमुळे प्रवासी संघटनांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा प्रकार नेहमी घडत असून, प्रवाशांना अनेकदा घरी पोहोचण्यासाठी उशिर होतो, त्यांना घरदार नाही का? असा संतप्त सवाल प्रवाशी संघटनांकडून करण्यात आला.आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबिवली ते टिटवाळा दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली.आज रविवार असल्याने मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यात भरीसभर म्हणून मालगाडीचे कपलिंग तुटल्यामुळे टिटवाळा ते आंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. लोकलला विलंब होत असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली.आज मेगा ब्लॉक असल्याने काही लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही इतर मार्गावर वळवण्यात आल्या होत्या, त्यामुळे आधीच रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होती. त्यात मालगाडीचे कपलिंग तुटल्याने वाहतूक आणखी विस्कळीत झाली.त्यामुळे प्रवाशी संताप व्यक्त करत होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami