संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुणे, पिंपरी, चिंचवडमधील शाळांना सुट्टी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी – पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी, चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून पुणे, पिंपरी, चिंचवडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुणे आणि पिंपरी, चिंचवडमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, उद्या पुणे आणि पिपंरी, चिंचवडमधील महापालिकांच्या शाळांसोबतच खासगी शाळांनादेखील सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुढील दिवसांबाबत उद्या पावसाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड क्षेत्रात सद्यास्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळांना १४ जुलैपर्यंत सुट्टी असणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami