नवी दिल्ली – अदानी समूहाच्या अदानी पॉवर लिमिटेडने पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील २ कंपन्या ६०९ कोटींना विकत घेतल्या आहेत. या दोन्ही कंपन्या खरेदी करण्याचा करार आणि त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.
पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील सपोर्ट प्रॉपर्टीज लिमिटेड आणि एटरनस रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे १०० टक्के भाग भांडवल अदानी समूहाने ७ जून २०२२ रोजी खरेदी केले. या दोन कंपन्या खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानुसार अदानी पावर लिमिटेडने सपोर्ट प्रॉपर्टीज २८०.१० कोटींना आणि एटरनस रिअल इस्टेट ३२९.३० कोटींना खरेदी केली आहे. एटरनस रियल इस्टेटची स्थापना २४ डिसेंबर २००७ मध्ये तर सपोर्ट प्रॉपर्टीजची स्थापना २ नोव्हेंबर २००७ मध्ये झाली होती. या दोन्ही कंपन्या अदानींनी विकत घेतल्या आहेत.