रत्नागिरी – वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी ईडी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या मागे लागली असून याप्रकरणी ईडीची रत्नगिरीत चौकशी अद्यापही सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे रोजी ईडीचे पथक दाखल झाले. तेव्हापासून हे पथक तिथेच तळ ठोकून बसले आहे.
2017 मध्ये 1 कोटी रुपये खर्च करून परबांकडून साई रिसॉर्टची जमीन खरेदी करण्यात आली. 2017 ते 2020 या काळात साई रिसॉर्टवर 25 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला. याची दखल घेऊन ईडीचे पथक याप्रकरणात 26 मे रोजी दापोलीत दाखल झाले होते. त्यानंतर आता खेड आणि रत्नागिरीमध्येही ईडीने चौकशी केली. मात्र अद्याप ही चौकशी सुरूच आहे. रत्नागिरीत ईडीचे पथक तळ ठोकून बसले आहे. त्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत भर पडली आहे.