काबूल- अफगाणिस्तानच्या काबूल येथे आयपीएल प्रमाणे सुरु असणाऱ्या अफगाणिस्तानमधील द स्पकिझा क्रिकेट लीग या स्पर्धेदरम्यान मैदानातच बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा एक आत्मघातकी हल्ला असून या हल्ल्यानंतर मैदानात मोठ्या प्रमाणात गडबड-गोंधळ उडाला होता. या बॉम्बब्लास्टनंतर सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे एका बंकरमध्ये नेण्यात आलं आहे. घटनेदरम्यान युनायटेड नेशन्सचा एक व्यक्ती मुलाखतीसाठी त्याठिकाणी गेला असल्याचंही समोर आलं आहे. ही घटना बंद-ए-अमिर ड्रॅगन्स आणि पामिर झल्मी या संघामध्ये सामना सुरु असताना घडली.