संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

अभिमानास्पद! ब्रिटीश संसदेकडून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींचा गौरव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासाठी कालचा बुधवार अविस्मरणीय ठरला. काल ब्रिटिश संसदेने त्यांना सन्मानित केले. २००२ साली ज्या दिवशी नॅटवेस्टच्या शेवटच्या सामन्यात गांगुलींनी भारताला विजय मिळवून दिला होता, त्याच दिवशी म्हणजेच १३ जुलै रोजी २० वर्षांनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. ब्रिटीश संसदेने बंगाली म्हणून त्यांचा सन्मान केल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाले, ‘ब्रिटिश संसदेने मला बंगाली म्हणून सन्मानित केले, त्यामुळे फार छान वाटले. ब्रिटिश संसदेत हा सोहळा पार पडला. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता. ते दरवर्षी हा पुरस्कार देतात, यंदा तो मला मिळाला.’ तसेच २००२ मध्ये खेळलेल्या नॅटवेस्टच्या ‘त्या’ शेवटच्या सामन्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘होय मी ते इंस्टाग्रामवर पाहिले. खूप दिवस झालेत ना? २० वर्षांपूर्वी, इंग्लंडमध्ये इंग्लंडला पराभूत करणे हा खेळातील सर्वोत्तम क्षण होता आणि त्यापेक्षा चांगले काही असू शकत नाही. सध्याचा संघही तेच करत आहे. या संघाने टी-ट्वेन्टी मालिका जिंकली. आता वनडे मालिकेत १-०ने आघाडीवर आहेत. इंग्लंडची खेळपट्टी नेहमीच गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यांनी इंग्लंडला सामन्यातून बाहेर काढले. तसेच भारताने उत्तम फलंदाजी करत १० गडी राखून विजय मिळवला. या खेळपट्टीवर त्यांनी किती चांगली फलंदाजी केली हे ११० धावांवरून दिसून येते. आतापर्यंत खूप छान खेळ झाला आहे.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami