मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे १६ जुलैपासून मराठवाड्याच्या दौर्यावर जाणार आहेत. १६ ते २५ जुलै असा १० दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरू होणाऱ्या या दौऱ्याचा शेवट औरंगाबादला असेल.
अमित ठाकरे यांचे १६ जुलै रोजी उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम, १७ जुलै रोजी ते तुळजापुर येथे तुळजा भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील, १७ जुलै रोजी त्यांचे लातुर जिल्ह्यात आगमन आणि मुक्काम असेल. १८ जुलै रोजी अमित ठाकरे लातुर जिल्हा पदाधिकार्यांसोबत बैठक आणि त्यांना मार्गदर्शन करतील. १८ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात त्यांचे मुक्काम होईल. १९ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात ते पदाधिकार्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात त्यांचे आगमन होईल. २० जुलै रोजी ते हिंगोली जिल्ह्यात पदाधिकार्यांसोबत बैठक आणि मार्गदर्शन करतील. त्यानंतर परभणी, जालना, बीड, औरंगाबाद येथे ते कार्यकर्त्यांची बैठक घेतील. त्यानंतर २५ जुलै रोजी अमित ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत.