संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

अमेरिकेच्या इंडियानात माॅलमध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोरासह ४ ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंडियानापोलीस – अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये काल, १७ जुलै रोजी संध्याकाळी गोळीबार झाला. यात हल्लेखोरासह चार जणांचा मृत्यू झाला आणि २ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर तेथील पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला असून मॉलच्या फूड कोर्टजवळील बाथरूममध्ये आढळलेली एक संशयास्पद बॅग जप्त केली आहे. तसेच आता कोणताही धोका नाही, मात्र काही काळासाठी नागरिकांनी या क्षेत्रापासून दूर राहावे, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

ग्रीनवूड पोलीस विभागाचे प्रमुख जिम इसान यांनी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार, हल्लेखोराने ग्रीनवूड पार्क मॉलच्या फूड कोर्टमध्ये घुसून अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली होती, तो दारुगोळ्यासंबंधातील अनेक मासिके घेऊन इथे घुसला होता. त्याच्या गोळीबाराने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोकांनी त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेत त्याला पकडले. त्यावेळी एका नागरिकाने त्याच्याजवळील बंदुकीने गोळी झाडली, त्यात हल्लेखोर ठार झाला. इसान यांनी सांगितले, ‘आपत्कालीन कॉल सेंटरला फूड कोर्टवर संध्याकाळी ६ वाजता गोळीबार झाल्याबाबत फोन आला होता. एका सशस्त्र नागरिकाने हल्लेखोरावर गोळी झाडल्यानंतर हा गोळीबार थांबला, अशी माहिती मिळाली. या गोळीबारात एकूण चारजण ठार झाले, तर दोनजण जखमी आहेत. आता ग्रीनवूड पोलीस तेथील परिसरावर नियंत्रण ठेवून आहेत, पुढे कोणताही धोका नाही. मात्र मी जनतेला विनंती करतो की, कृपया या क्षेत्रापासून दूर राहा.’

दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही इंडियानामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. इंडियानामधील गॅरी सिटीमध्ये एका पार्टीदरम्यान गोळीबार झाला होता. या घटनेत ३ जण ठार झाले होते, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami