पुणे – सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले पुण्याचे बडे बिल्डर अविनाश भोसले हे गेले काही दिवस दिल्लीत सीबीआयच्या ताब्यात आहेत. आता त्यांना मनी लॉंड्रींग गतिरोध न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नोटीस दिली आहे.
पीएमएलए न्यायालयाने २८ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार अविनाश भोसलेंना बजावलेल्या नोटिशीत त्यांचे पुण्यातील जप्त कार्यालय दहा दिवसांत रिकामे करण्यास सांगितले आहे. पुण्यात विद्यापीठ रस्त्यावर त्यांचे १२ मजल्यांचे अत्यंत भव्य कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांना दहा दिवसांत रिकामे करायचे आहे. काल एकनाथ खडसे यांनाही अशाच प्रकारची नोटीस बजावली होती.