मुंबई – नउद्योगपती अविनाश भोसले यांच्या ईडी कोठडीत १२ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील अविनाश भोसले यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. अविनाश भोसले यांना २६ मे रोजी अटक केली होती. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई झाली होती.