मुंबई – महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आजही काहीसा दिलासा मिळाला. कारण आज सलग सोळाव्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा पेट्रोल, डिझेलची भाववाढ होणार की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
दरम्यान, WTI Crude मध्ये आज ०.६२ टक्क्यांची वाढ झाली, त्यामुळे त्याची किंमत आता ११९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. तर, ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ०.५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांबाबत बोलायचे झाले तर, राजधानी दिल्लीत आज १ लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि १ लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. तर, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये आणि डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०६.०३ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.७६ रुपये प्रतिलिटर आहे. तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रतिलिटर आहे.