संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या
मुलीची गळफासाने आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद – दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मेहुणी उमा माहेश्वरी यांनी आज सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उमा माहेश्वरी या बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी उमा माहेश्वरी यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासणीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. या प्रकरणी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे. तसेच आत्महत्येचे नेमके प्रकरण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami