संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

आजपासून सर्वांना कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत मिळणार

covid-19, vaccine, corona-5358852.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने १८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत काल घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज, शुक्रवारपासून सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर कोरोनाचा बूस्टर डोस मोफत उपलब्ध असणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे पूर्वी दुसऱ्या डोसच्या ९० दिवसांनंतर अर्थात तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. मात्र, आता हा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता बूस्टर डोस दुसऱ्या डोसनंतर ७५ दिवसांत म्हणजेच अडीच महिन्यांनंतर घेता येणार आहे.

कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक आणि लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ. ब्रिजय पानीग्रही यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, ‘आजपासून आपण मोफत बूस्टर डोसला सुरुवात करत आहोत. पुढील ७५ दिवसांत अर्थात १५ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात आपण १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न करणार आहोत.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami