मुंबई – खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या बुधवार १३ जुलै रोजी अवकाशात सुपरमून म्हणजे सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे.वर्षभर पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राच्या आकारापेक्षा यंदा चंद्राचा आकार चौदा टक्क्यांनी मोठा असेल. हा अभूतपूर्व नजारा नागरिकांना ‘याची देही याची डोळा’ पाहता येणार आहे.
यावर्षीचा पहिला सुपरमून १४ जून रोजी दिसला होता. आता दुसरा सुपरमून उद्या बुधवारी आणि शेवटचा तिसरा सुपरमून ऑगस्ट महिन्यात दिसणार आहे. उद्या चंद्र आणि पृथ्वीमधील सर्वात कमी असते.यावेळी चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीपासून ३५७,२६४ किमी अंतरावर असणार आहे.त्याचा परिणाम समुद्रावर दिसणार आहे. यावेळी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.हा तीन दिवस म्हणजे शुक्रवार पर्यंत दिसणार आहे. बुधवारी रात्री १२.७ वाजण्याच्या सुमारास हा सुपरमून दिसेल ,असे नासाने म्हटले आहे.सुपरमून हा शब्द सर्वात आधी रिचर्ड नोल यांनी वापरला होता.
दरम्यान, अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी आणि यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ मध्ये दिसला होता.सुपरमून हा नेहमीच्या चंद्रापेक्षा सुमारे १४ टक्के मोठा आणि सुमारे ३० टक्के अधिक प्रकाशमान भासतो.