संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

आज आरे कारशेडबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- मुंबईतील आरे वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. उद्या शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार असून वनशक्ती संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. 1800 एकर जागेवर पसरलेले आरेचे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. याचिकाकर्त्यांचे वकील अनिता शेनॉय यांनी आरेतील वृक्षतोडीची माहिती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.वी. रमण्णा यांना दिली होती. आरेत राजरोसपणे वृक्षतोड केली जात असल्याचेही शेनॉय यांनी रमण्णा यांना सांगितले. त्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. आता ही सुनवाणी उद्या न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होईल, असे रमण्णा यांनी सांगितलं.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami