मुंबई- गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच ‘चिंचपोकळी चा चिंतामणी’ मागील दोन वर्ष कोरोना काळ पाहता उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता, यंदा कोरोना संक्रमण तीव्रता थोडी कमी असल्याने तसेच परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याने मंडळाने गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे ठरविले आहे. यंदाचे हे १०३ वर्ष असून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणेशोत्सवाचा शुभारंभ उद्या रविवार २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता “पाटपूजन सोहळ्याने” होणार आहे. मंडळाचे उपमानदसचिव चारुदत्त लाड यांच्या हस्ते पाटपूजन मंगलमय व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. अशी माहिती मानद सचिव वासुदेव सावंत यांनी दिली आहे.