संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

आज हार्बरच्या दोन्ही रेल्वे
मार्गावर मेगा ब्लॉक घोषित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेने उद्या रविवार ३१ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईन विभागांत मेगाब्लॉक घोषित केला आहे.तर मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.
या ब्लॉक कालावधित ठाणे आणि वाशी,नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी,नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी,नेरूळ,पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणार्‍या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी,वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४०पर्यंत आणि चुनाभट्टी,वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वडाळा येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी,बेलापूर, पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे,गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami