मुंबई – मुंबई मेट्रो आता रात्री उशीरापर्यंत मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशिरापर्यंत म्हणजे रात्री १२ वाजेपर्यंत धावणार असून आज शनिवारपासून शेवटची गाडी रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत सुटणार आहे.तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी रात्री ११ वाजून १९ मिनिटांत सुटेल, अशी माहिती एमएमओपीएल म्हणजेच मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली.
कोरोना साथीमुळे मेट्रो सेवेचा कालावधी आणि फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या.हा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर
‘एमएमओपीएल’ने टप्प्याटप्प्याने वेळ आणि फेऱ्या वाढविल्या. या साथीचे सर्व निर्बंध हटल्यानंतर ही प्रवासी सेवा पूर्ववत झाली असून सकाळी साडेसहा ते रात्री १२ वाजून ७ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.त्यानंतर आता ‘एमएमओपीएल’ने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत घाटकोपरवरून रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी शेवटची गाडी सुटत होती. मात्र आज शनिवारपासून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी शेवटची गाडी सुरू केली आहे.तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी सुरू केली आहे आहे.तसेच घाटकोपरवरून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत सुटणारी गाडी वर्सोवा स्थानकात रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पोहचणार आहे.मात्र त्याच वेळी सकाळच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही.वेळापत्रकानुसार वर्सोवा आणि घाटकोपरवरून सकाळी ६.३० वाजता पहिली गाडी सुटणार आहे.