दिल्ली- केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लसीनंतर नऊ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता.मात्र आता हा कालावधी कमी करत सहा महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागणी काही दिवसांपासून बुस्टर डोसचा कालावधी कमी करा अशी मागणी होत होती. अखेर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये डॉक्टर्स, आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६०च्या वर वय असणाऱ्यांना तसेच सहव्याधी असणाऱ्यांना लोकांना सर्व प्रथम बूस्टर डोस दिले गेला होता. या निर्णयामुळे भारतातील असंख्य नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.