मुंबई- युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळीत शनिवारी विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. मात्र राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे आदित्य ठाकरे यांचे आजचा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आले.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची काल भाषण करताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोेेदींनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. अशात शनिवारी बुद्ध गार्डन येथील विकास कामाचे लोकार्पण, अभ्यास गल्लीचं लोकार्पण, वरळी नाका ते लोअर परळ रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गणपतराव कदम मार्गावरील विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचे हे सर्व कार्यक्रम राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे रद्द करण्यात आले.