संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

आप्पासाहेब देशमुखांना 24 जूनपर्यंत ईडी कोठडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा- श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त आप्पासाहेब देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने काल शुक्रवारी अटक केली. अटकेनंतर आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना शुक्रवार 24 जूनपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

गेल्या वर्षी याच मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आप्पासाहेब देशमुख यांना अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही सख्ख्या भावांना अटक केल्याने मान तालुक्यात खळबळ उडाली आहे. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून अ‍ॅडमिशनसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूर येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेश सोसायटीला 2012-13 आणि 2013-14 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याची परवानगी मिळाली होती. 100 जागांसाठी ही परवानगी मिळाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami