मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हिप बोनची शस्त्रक्रिया झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची विचारपूस करण्यासाठी जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून ते पक्षाच्या कामामध्ये सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
राज ठाकरे पुन्हा सक्रिय होत असताना त्यांचे पुत्र अमित ठाकरे महासंपर्क अभियान घेत आहेत. यात ते मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहे.अमित ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला होता.