संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

इंदापुरात विमान कोसळले! प्रशिक्षणार्थी पायलट जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंदापूर – बारामतीतील विमानतळावरून आज सकाळी उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीनजीक कोसळल्याने प्रशिक्षणार्थी महिला पायलट जखमी झाली. भाविका राहुल राठोड असे या पायलटचे नाव आहे. बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जात होते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले. ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण या ठिकाणी पोहोचले. त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, बाकी विमानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami