इंदापूरच्या कालठण नं .1 गावातील उपसरपंचपदी दिनकर जगताप बिनविरोध

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

इंदापूर – तालुक्यातील ऊसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कालठण नं.1 या राजकियदृष्टया संवेदन असलेल्या गावाच्या उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने दिनकर मधुकर जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच सोनाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच दिनकर जगताप यांनी आपल्या निवडीनंतर गावातील नागरिकांचा सन्मान ठेऊन गावहितासाठी केल्या जाणार्‍या कामात सरपंच आणि अन्य सहकारी सदस्यांना साथ देण्याचे आश्वासन दिले.या बैठकीला कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, सरपंच सोनाली जाधव, भागवत गटकूळ,विठ्ठल सपकळ, मधुकर क्षीरसागर, आणि सर्व ग्रामपंचायात सदस्य या सदस्यांसह ग्रामसेवक हनुमंत पाटील, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Close Bitnami banner
Bitnami