तेहरान – इराणमध्ये आज सकाळी एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरून १० जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील तबास या वाळवंटी शहराजवळ पहाटेच्या अंधारात ट्रेनच्या सातपैकी चार बोगी रुळावरून घसरल्या. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.