संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

ईडीच्या दाव्यामुळे मालिकांच्या अडचणीत आणखी वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांचा थेट संबंध असल्याचे पुरावे आम्हाला सापडलेले आहेत.असे सांगून ईडीने मलिक यांच्या जामिनाला विरोध केला आहे . त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

मनी लॉन्डरिंग प्रकरणात नवाब मलिक याना २३ फेब्रुवारी रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला पण ईडीच्या विरोधामुळे मलिक याना जामीन मंजूर होऊ शकला नाही. दरम्यान मलिक यांनी नव्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात म्हटले होते कि पाच महिने उलटले तरीही तपस यंत्रणेकडून सबळ पुरावे न्यायालयाला सादर करण्यात आले नाहीत.त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा अशी मलिक यांच्याकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सत्र न्यायालयाने या प्रकरणी ईडीला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. आज ईडीने एका प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयास सांगितले कि नवाब मलिक यांच्या विरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमतेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात आढळून आलेले आहे. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याच्या चौकशीत मलिक यांच्या बाबतची बरीचशी माहिती आमच्या हाती आलेली आहे . तसेच नवाब मलिक हे वैद्यकीय कारणास्तव ६ महिने कारागृहाच्या बाहेर होते. मात्र आता त्यांचे कारागृहाबाहेर राहण्याचे कोणतेही स्पस्ट कारण दिसत नाही. मे महिन्यात न्यायालयाने मलिक याना ६ आठवढ्यांसाठी खाजगी रुग्णालयात उपचारांची परवानगी दिली होती. मात्र सहा आठवडे उलटून गेल्यानंतरही मलिक यांच्यावर होणाऱ्या वैद्यकीय उपचारांच्या बाबत कोणतीही खात्रीलायक माहिती आमच्याकडे नाही शिवाय त्यांच्या जामीन अर्जात वैद्यकीय पार्शवभूतीचा उल्लेख नाही म्हणूनच त्यांना जमीन देऊ नये त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवावे अशी मागणी ईडीने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केली आहे त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami