संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

उत्तराखंडचे भाजप अध्यक्ष बदलले
महेंद्र भट्ट नवे प्रदेशाध्यक्ष बनले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डेहराडून – उत्तराखंड भाजपमध्ये खांदेपालट झाला आहे. प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांना हटवून त्यांच्या जागी उत्तराखंड भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते महेंद्र भट्ट यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भट्ट यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
उत्तराखंडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते महेंद्र भट्ट यांनी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. बद्रीनाथ आणि नंदप्रयाग विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले होते. अनेक राज्यांमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांची उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यामुळे तेथे पक्ष मजबुतीला बळकटी मिळेल, असा त्यांना विश्वास आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami