सातारा – गेले आठवडाभर शिवसेनेचे उपकार व प्रयत्नाने मंत्री, आमदार झालेल्या सातारा जिल्ह्यातील तीन गद्दार बंडखोरांविरोधात मोठा आक्रोश व्यक्त होत आहे. खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी आज दुपारी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है,,, निम का पत्ता कडवा है।एकनाथ शिंदे,शुभराज देसाई, महेश शिंदे, भडवा है।अशी घोषणाबाजी दिली. यावेळी ऐंशी वर्षाच्या सीताबाई पालवे यांनी शिवसेनेचे समर्थन करीत घोषणाबाजी केली. यावेळी राणी काळे, दिलशाद सलीम तांबोळी, प्रमिला दुबळे, सीताबाई पालवे, प्रियांका दुबळे, सलमा शेख, संध्या देशमुख, धनश्री इनामदार, गोसावी आदि सहभागी होत्या.