संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

एक्सप्रेसची कपलींग तुटून इंजिन पुढे आणि डबे मागे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव : जळगावमध्ये रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे. पाटलीपूत्र एक्सप्रेसची कपलींग तुटल्याने या गाडीचे काही डबे इंजिनसह पुढे निघून गेले, तर काही डबे मागेच राहिल्याने खळबळ उडाली. मंगळवारी २६ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.

पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव मार्गे मुंबईला जात होती.दरम्यान,पाटलीपुत्र एक्स्प्रेस वाघळी स्थानकांवरून निघाली असताना एक्स्प्रेस काही अंतर दूर गेल्यानंतर अचानक रेल्वेचे अर्धे डब्बे सोडून इंजिन पुढे गेली आणि रेल्वे दोन भागांत विभागली गेली. त्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड केला असता लोकोपायलटने रेल्वे एक्सप्रेस थांबवली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.या अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या इंजिनला सर्व डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami