संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

एनआयएची सहा राज्यांत छापेमारी! कोल्हापुरात सख्खा भावांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- इसिस कनेक्शनप्रकरणी आज सहा राज्यांतील वेगवेगळ्या 13 ठिकाणी एनआयएने आज मोठी छापेमारी केल्याने देशभरात एक खळबळ उडाली. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या हुपरी आणि नांदेडमध्ये सकाळी सात वाजल्यापासून एनआयएने छापेमारी सुरु केली होती. या कारवाईत एनआयएच्या पथकानी महत्वाची कागदपत्रे जप्त केल्यानंतर हुपरीतून दोन सख्खा भावांना अटक केली.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांचा संबंध इसिससोबत असल्याची माहिती समोर आली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून एनआयएची टीम या संदर्भात तपास करत होती आणि त्यानंतर आज एनआयएने महाराष्ट्र(कोल्हापूर आणि नांदेड), मध्य प्रदेश(भोपाळ आणि रायसेन), बिहार(अरारिया), कर्नाटक(भटकळ आणि तुमकूर), गुजरात (भूरुच, सुरत, नवसरी, अहमदबाद), उत्तर प्रदेश (देवबंद)या राज्यांत ही छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील देवबंद येथून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. संशयित तरुण हा मदरशाचा विद्यार्थी असून हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून आयसीस मॉड्यूलच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच कोल्हापूरातील हुपरी-रेंदाळ दरम्यान असलेल्या अंबाबाई नगरात कोणतीही कुणकुण न लागता एनआयए पथकाचा ताफा आज पहाटेच धडकल्याने परिसरात खळबळ उडाली. इर्शाद शौकत शेख आणि त्याचा भाऊ अल्ताब शेख या सख्खा भावांची एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या राहत्या घरी सात तास चौकशी केली. त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एनआयएने जप्त केल्यानंतर या सख्खा भावांना अटक केली. इर्शाद हा लबैक इमदाद फौंडेशनचा अध्यक्ष म्हणून काम करतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami