लंडन – जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओन्स जबेउरचा पराभव करून कझाकिस्थानच्या एलेना रिबाकिनाने इतिहास घडवला. विम्बल्डन २०२२ महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तिने ३-६, ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये शानदार विजय मिळवला. ग्रास कोर्ट स्लॅम जिंकणारी कझाकिस्थानची ती पहिली खेळाडू आहे. २०११ पासून विम्बल्डन जिंकणारी ती सर्वात तरुण खेळाडू ठरली. २३ वर्षांच्या एलेनाने असे अनेक बहुमान एकाचवेळी पटकावले.
विम्बल्डन महिला एकेरीचा सामना कझाकिस्थानची एलेना आणि जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाची ओन्स यांच्यात शनिवारी झाला. अटीतटीच्या या लढतीत २ तास झुंज देऊन एलेनाने ओन्सवर ३-६, ६-२, ६-२ असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले. कझाकिस्थानच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने शनिवारपर्यंत एकेरी स्पर्धेत विजेतेपद पटकावले नव्हते. विशेष म्हणजे विम्बल्डन स्पर्धेत केवळ दोन सेट तिने गमावले आहेत.