संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

एसटी कर्मचार्‍यांचा पगार
खासगी बँकांमध्ये होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा पगार आता फेडरल, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या खासगी बँकांमध्येही होणार आहे. पगाराची खाती या बँकांमध्ये उघडण्याची सूचना महामंडळाने कर्मचार्‍यांना दिली आहे. यामुळे अगोदरच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक आणखी आर्थिक अडचणीत येणार आहे. एसटी कर्मचार्‍यांचे पगार आतापर्यंत स्टेट बँक आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत होतात. मात्र आता ते खासगी बँकांमध्येही होणार आहेत.
एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे बहुतांश व्यवहार स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून होतात. पूर्वी एसटी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना स्टेट बँक आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत पगाराची खाती उघडणे बंधनकारक होते. मात्र आता फेडरल, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या खासगी बँकांमध्येही वेतन खाते उघडण्याची मुभा महामंडळाने दिली आहे. महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकार्‍यांनी ही परवानगी दिली आहे. त्यामुळे स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे. या बँकेच्या राज्यात 52 शाखा आहेत. 11 विस्तार केंद्र आहेत. 85 हजार एसटी कर्मचारी बँकेचे सभासद आहेत. 35 हजार कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत. त्यांचे पगार याच बँकेतून होतात. उर्वरित कर्मचार्‍यांना स्टेट बँकेतून पगार मिळतो

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami