मुंबई- एसटी कामगारांच्या जून महिन्याच्या थकीत पगारासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपये आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाला एकूण 360 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 1 हजार 450 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
त्यातील 300 कोटी रुपये एप्रिलसाठी, तर 360 कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी वेतन विलंबामुळे एसटी कामगारांनी संप केला होता. कर्मचार्यांनी अनेक दिवस संप केला होता. त्यामुळे कर्मचार्यांना नियमित वेतन मिळावे यासाठी शासनाने एसटीला पुन्हा मोठी मदत केली आहे. काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी पाच महिने संपावर गेले होते. एसटीचे विलीनीकरण व्हावे ही एसटी कर्मचार्यांची मागणी होती. ती मागणी पूर्ण झाली नव्हती. आता नवे सरकार एसटी कामगारांसाठी काय करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.