संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

एसटी कामगार संघटनेचा ‘मॅक्सीकॅब’ला तीव्र विरोध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राज्यात ‘मॅक्सीकॅब’सारख्या प्रवासी वाहतुकीला अधिकृत दर्जा देण्यात यावा का?, यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीकडून आज राज्य परिवहन मंडळातील 22 कर्मचारी आणि मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत मॅक्सीकॅब वाहनांना परवानगी देण्यास संघटनेने तीव्र विरोध केला. तसेच मॅक्सीकॅब वाहनांना परवानगी देण्याचा निर्णय झाल्यास संघटना तो निर्णय हाणून पाडेल, असा स्पष्ट इशाराही बैठकीत संघटनेच्यावतीने देण्यात आला.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की, बैठकीमध्ये संघटनेने मॅक्सीकॅबला तीव्र विरोध करीत असतानाच एसटी च्या लालपरीचे या महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीसाठी असलेले योगदान तसेच एसटी महामंडळाची सुरक्षित व किफायतशीर सेवा, कोरोना काळात सुमारे 300 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांनी आपल्या जीवाची आहुती देऊन केलेली राज्याची सेवा यावर लक्ष वेधत मॅक्सीकॅब आली तर ती फक्त फायद्याच्या मार्गावरच सेवा देईल. मात्र खेडोपाडी डोंगर दर्‍यातून विद्यार्थी, शेतकरी, मजूर व चाकरमान्यांना फक्त एसटी सेवा देत असते. मात्र जाणीवपुर्वक एसटीचा वाढ व विस्तार रोखला गेला. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला. तसेच समाजातील विविध प्रकारच्या सुमारे 28 घटकांना एसटी सवलती देत असते. त्या सवलती मॅक्सीकॅब देऊ शकणार नाही. मुख्य म्हणजे एसटीचे चालक हे प्रशिक्षीत असल्याने एसटीच्या अपघाताचे प्रमाण अत्यल्प आहे. उलट मॅक्सीकॅबच्या अपघाताचा धोका अधिक असून कदाचित प्रसंगी अपघात झाल्यास एसटीकडे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतःचा निधी राखीव असतो. मात्र मॅक्सीकॅबबाबत विमा कंपन्यांवर अवलंबून रहावे लागेल. एका एसटीच्या मागे सुमारे सात लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र मॅक्सीकॅबमुळे केवळ एकाच व्यक्तीला रोजगार मिळणार असल्याने तोही उद्देश सफल होत नाही. यास्तव एसटीची सेवा प्रवाशीभिमुख करून एसटीच्या गाड्या वाढवून एसटीचा विस्तार करणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशांची मॅक्सीकॅबची कोणतीही मागणी नसून त्यांची लालपरीलाच पसंती असल्याची भुमिका संघटनेने मांडल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami