संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

ओबीसी आरक्षणावरील आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल कोर्टात सादर केला. तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात गरजेची असलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याचंही राज्य सरकारने कोर्टात सांगितलं होते. सर्वोच्च न्यायालयाकडून मध्य प्रदेशाला ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळाले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्रच्या बाबतीत कोर्टाचा काय निकाल लागतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टातील गेल्या सुनावणीत निर्देश दिले होते. आधीच जाहीर झालेल्या निवडणुकांत बदल नको असे म्हणत नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम हा पुढील निकाल येईपर्यंत जाहीर करू नये असंही कोर्टाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि ४ पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. ज्या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली आहे त्या 92 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया थांबणार नाहीये. तर ज्या ठिकाणी अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाहीये त्या ठिकाणचे ओबीसींचे राजकीय आरक्षण हे बांठिया आयोगाच्या वैधतेवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्टा काय निर्णय देतं याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami