मुंबई – हार्बर रेल्वेच्या गोवंडी स्थानकाजवळ आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा होऊन हार्बर सेवा ठप्प झाली. त्याचा मोठा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना बसला. त्यांचे अतोनात हाल झाले. दुरुस्तीनंतर वाहतूक सुरू झाली. मात्र त्यानंतर दुपारी उशिरापर्यंत लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ सकाळी ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे पनवेलकडून सीएसएमटीला जाणारी वाहतूक कोलमडली. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मानखुर्द ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेचा फटका प्रवाशांना बसला. हार्बरच्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. वायरच्या दुरुस्तीनंतर लोकल सुरू झाली. मात्र दुपारी उशिरापर्यंत गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.