संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

ओसामाच्या कुटुंबाने प्रिन्स चार्ल्स यांच्या संस्थेला १० लाख पौंड दिले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन- ओसामा बिन लादेन यांच्या कुटुंबीयांकडून इंग्लंडचे प्रिन्स चान्स यांच्या संस्थेला १० लाख पौंडचा निधी मिळाला, अशी धक्कादायक माहिती संडे टाइम्सने दिली आहे. २०१३ म्हणजे लादेनला अमेरिकेने ठार मारल्यानंतर केवळ दोनच वर्षांनी चार्ल्स यांच्या ‘द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल’ला हे पैसे मिळाले. दरम्यान, संस्थेच्या ट्रस्टीनी पडताळणी करून हे पैसे स्वीकारल्याचे आणि लादेनच्या सावत्र भावांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नसल्याने पैसे स्वीकारले. त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, असा खुलासा ब्रिटनच्या राजघराण्याने केला आहे.

ओसामा बिन लादेनच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबत असलेली सर्व नाती आणि संबंध १९९४ सालीच तोडून टाकले होते. सावत्र भावांचा लादेनच्या कोणत्याही कृतीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे बकीर बिन लादेन आणि त्याचा भाऊ शफिक बिन लादेन यांच्याकडून द प्रिन्स ऑफ वेल्स संस्थेसाठी १० लाख पौंड स्वीकारले. प्रिन्स चार्ल्स यांची त्यांनी राजवाड्यात भेट घेतली. संस्थेच्या विश्वस्थांनी विचारपूर्वक पडताळणी करून हा निधी स्वीकारला. त्यामुळे याचा दुसरा कुठलाही अर्थ लावला तर ते चुकीचे ठरेल, असे राजवाड्याने स्पष्ट केले आहे. या ट्रस्टच्या पैशातून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, इंग्लंड आणि परदेशात अनेक प्रकल्प राबवले जातात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami