उस्मानाबाद – औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली. मात्र, या दोन्ही शहरांच्या नामांतराविरोधात आता याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादनंतर आता उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालय दाखल करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामकरण केल्याच्या विरोधाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दाखल करणारे याचिका दाखल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद येथील मसुद शेख आणि इतर १६ जणांनी ही याचिका दाखल केली आहे.वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे, नामांतराचा वाद आता पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे याआधी १९९८ साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने २००१ साली रद्द केला.त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.