मुंबई – राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले असले तरी त्याआधी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे तापलेल्या राजकिय वातावरणातच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे.यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड आणि फलटण तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतीचा समावेश आहे.येत्या ४ ऑगस्ट रोजी मतदान आणि ५ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोयना वसाहत,उत्तर कोपरडे, आदर्शनगर,उत्तर तांबडे, पश्चिम उंब्रज ,बेलवाडी, शीतळवाडी,नाणेगाव बुद्रुक तसेच फलटण तालुक्यातील परहर बुद्रुक आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.तर ५ जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. १२ ते १९ जुलै दरम्यान अर्ज भरण्याची मुदत, २० जुलै रोजी अर्जाची छाननी, तर अर्ज मागे घेण्याची मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तसेच चिन्हाचे वाटपही करण्यात येईल.त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान आणि ५ ऑगस्टला मतमोजणी होईल.यामुळे पुढील महिन्यात या ग्रामपंचायत हद्दीत प्रचार रणधुमाळी गाजणार आहे. राज्यात एकूण २८,८१३ ग्रामपंयायती आहेत.