संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

कर्जत तालुक्यातील आषाणे धबधबा पावसाळी पर्यटनाचे आकर्षण स्थळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत.त्यापैकी एक असणारा आषाणे धधबधबा म्हणजे तर पावसाळी पर्यटनाचे हमखास आकर्षण स्थळ म्हणून त्याची ख्याती आहे.पावसाळ्याच्या चार महिन्यात याठिकाणी लाखो लोक हजेरी लावून पर्यटनाची मजा लुटताना दिसतात.हा धबधबा सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुललेला दिसत आहे.
तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन पासून थोड्यात अंतरावर असणाऱ्या या धबधब्याचे पाणी तीन टप्प्यात कोसळताना दिसते.उमरोली गावातून बाहेर पडले की पर्यटकांचे पाय या आषाणे धबधब्याकडे वळतात.वाटेतच एक ओढा लागतो.या ओढ्यातून मार्गक्रमण करताच समोर निसर्गरम्य धबधबा नजरेस पडतो.या ठिकाणी पर्यटकांना लज्जतदार जेवणाची मेजवानी देण्यासाठी उमरोली आणि आषाणे गावातील लोक कायम सज्ज असतात.तसेच डिस्कळ नाक्यावरील गरम वडे आणि भजी हमखास घ्यावीशी वाटतात.तसेच पावसात भिजल्यानंतर चहा आणि कॉफीचे गरम घोट आणि त्याआधी मक्याची कणसे काही वेगळीच चव निर्माण करतात.सध्या हा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाला आहे.आठवड्याच्या अखेरीस याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami