पालघर : जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र महेश रामा पडवळे या जवानाला वीरमरण आले आहे. पंजाब प्रांतातील भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या महेश रामा पडवले यांना साप चवल्यांनंतर उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या बिएन मुख्यालय ५८ माधोपूर येथे कर्तव्य बजावत असतानां जवान महेश पडवळे यांच्या डाव्या हाताला साप चावला होता. त्यांनतर लगेच महेश पडवले यांच्या पत्नी प्रमिला पडवळे यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. तसेच महेश पडवळे यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिट्लमध्ये तातडीने हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानांच महेश पडवळे यांचा मृत्यूशी संघर्ष अयशस्वी झाला. दरम्यान, महेश पडवले यांचे पार्थिव रात्री मुंबईत आणल्यानंतर आज कऱ्हे या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.