संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

कर्नाटकात भाजप कार्यकर्त्यानंतरआणखी एका तरुणाची हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मंगळूरु : कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लोरे येथे मंगळवारी रात्री भाजप युवा मोर्चाचे नेते प्रविणकुमार नेत्तर यांची हत्या झाली होती. त्यांनंतर मंगळूरु शहराच्या बाहेरील सुरतकल येथे एका कापड दुकानाबाहेर गुरुवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी एका मुस्लिम तरुणाची हत्या केली आहे. दरम्यान तरुणावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

गुरुवारी २८ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास २३ वर्षीय फझील नामक तरुणावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,अशी माहिती मंगळुरुचे पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी दिली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुरतकल, पानंबूर,मुलकी आणि बाजपे पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलम १४४ अंतर्गत ३० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.आयुक्तालय हद्दीतील सर्व दारुची दुकाने २९ जुलैला बंद असणार आहेत. आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना घरामध्येच नमाज पठण करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असेही आवाहन केले आहे.

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून जातीयवादी घटनांमध्ये वाढ झाली असून, अशा प्रकारच्या घटनांना वेळ पडल्यास आळा घालण्यासाठी योगी मॉडेल लागू केले जाईल असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या घटनांनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना रद्द केले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami