नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून सरकारी कर्मचार्यांच्या अर्निंग राजा साठवण्याच्या मर्यादेत 150 ने वाढ होणार आहे. सध्या ही मर्यादा 300 आहे. ती 450 होणार आहे.
सरकारी कर्मचार्यांना सध्या वर्षाला 30 अर्निंग रजा मिळतात. संरक्षण विभागात वर्षाला 60 रजा मिळतात. वर्ष पूर्ण झाल्यावर या रजा पुढील वर्षात वर्ग होतात. अशाप्रकारे कर्मचार्याला अर्जित रजा 300 पर्यंत साठवता येतात. वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. त्यानुसार 240 ते 300 एवढ्या रजा साठवता येतात. निवृत्तीच्या वेळी या रजांचे बेसिक पगारानुसार पैसे मिळतात. आता या रजांची साठवणूक मर्यादा 450 पर्यंत वाढवली जाणार आहे. मात्र या सुट्ट्यांचा पगार 20 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. त्यासाठी श्रम मंत्रालयाने कामगार कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा म्हणजे अर्निंग रजांची मर्यादा वाढणार आहे.