खारघर : एका वाहतूक पोलिसाला कारचालकाने भरपावसात कारच्या बोनेटवरुन जवळपास १०० मीटर फरफटत नेल्याची घटना नवी मुंबईतील खारघर परिसरात घडली आहे. हा वाहतूक पोलीस कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाला अडवत होता. परंतु चालकाने थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घालत त्याला पुढे फरफटत नेले. ह्या घटनेचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे. ही घटना शनिवारी ९ जुलै रोजी १२ वाजता घडली असून, ह्या कारचालकाची मुजोरी त्याला महागात पडली आहे. कारचालकाविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.