संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

काश्मिरी पंडितांवर वादग्रस्त वक्तव्य; साई पल्लवी विरोधात तक्रार दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद – दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या साई तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान साई पल्लवीने काश्मिरी पंडितांची हत्या आणि त्यांच्यावरील अत्याचाराची तुलना मॉब लिंचिंगशी केल्याने तिच्याविरुद्ध हैदराबाद पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हैदराबाद येथील सुलतान बाजार पोलीस ठाण्यात बजरंग दलाच्या एका नेत्याने साई पल्लवीविरोधात तक्रार दाखल केली आहे. साई पल्लवी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा संदर्भ देत म्हणाली होती की, चित्रपटात त्यावेळी काश्मिरी पंडितांची हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे पण त्यापलिकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्रीरामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे? ज्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. तिने व्यक्त केलेल्या या व्यक्तव्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचे मत योग्य असल्याचे म्हटले आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. साई पल्लवीने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे. तसेच तिने असेही म्हटले की, ‘मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंगबद्दल खूप ऐकले आहे पण कोण बरोबर आणि कोण चूक, हे मी सांगू शकत नाही. काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते हे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे, पण त्याचवेळी काही काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याला जय श्री रामचा नारा लावण्यास सांगितले गेले, हीसुद्धा धर्माच्या नावावर होणारी हिंसा आहे. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami