संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

कॅनडात ‘टार्गेट किलिंग’! हल्लेखोराने लोकांना निवडून निवडून गोळ्या घातल्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ओटावा- कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात सोमवारी पहाटे सामूहिक ‘टार्गेट किलिंग’ झाले. हल्लेखोराने बेघर लोकांना निवडून निवडून गोळ्या घातल्या. ब्रिटिश कोलंबियाच्या लैंगली शहरात ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर तेथे इमर्जन्सी अलर्ट जारी केला. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील लैंगली शहरात सोमवारी पहाटे हल्लेखोराने बेघर लोकांवर गोळीबार सुरू केला. शहराच्या अनेक भागात ठराविक समुदायाच्या लोकांना त्याने लक्ष्य केले. त्यामुळे हा टार्गेट किलिंगचा प्रकार असल्याचे रॉयल कॅनडियन माउंटेन पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या घटनेत नेमके किती लोक ठार झाले त्याची माहिती मिळालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हल्लेखोराचा शोध सुरू आहे. लैंगली शहराच्या इतर भागातही त्याने अशाच प्रकारे गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. बस स्टॉप, कॅसिनो आणि पार्किंग अशा ठिकाणी राहणाऱ्यांना हल्लेखोराने लक्ष्य केले. त्यामुळे सकाळी ६.२० वाजता इमर्जन्सी अलर्ट जारी केला. नागरिकांना सतर्क राहण्याच्या व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami