वॉशिंग्टन – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका जंगलामध्ये भीषण स्वरुपचा वणवा लागला आहे. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या जंगलातील सर्वात हा मोठा वणवा मानला जात आहे.
ही आग ओक येथील योसेमाइट नॅशनल पार्क जवळ वेगाने पसरत असल्याचे सांगीतले जात आहे.अग्निशमन दलालाही आगीवर नियंत्रण आणणे कठीण होऊन आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग भीषण असून कर्मचाऱ्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात आले आहे. आगीत अनेक घरे जळून खाक झाली आहे. या आग लागलेल्या परिसरातून ६ हजारहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.मारिपोसा काउंटी येथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या या आगीवर पुढील आठवड्यापर्यंतही नियंत्रण मिळण्याची शक्यता नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कॅलफायरच्या प्रवक्त्या नताशा फॉउट्स यांनी सांगितले आहे की, पुढील आठवड्यातही आगीवर नियंत्रण मिळवण्याची शक्यता कमी आहे.